बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात ‘रूप पाहता लोचनी’ या पंढरीच्या वारीतील छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ९ जुलैपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात छायाचित्रकारांनी टिपलेले वारकऱ्यांच्या वाटचालीतील काही बोलके क्षण जसे रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहेत, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेली विहंगम दृश्येही वारीची भव्यता मनावर ठसवत आहेत.
या छायाचित्र प्रदर्शनाला मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, नगरसेवक अभिषेक घोसाळकर, आयोजक श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे म्हणजे आषाढीच्या वारीचे विहंगावलोकन आहे, असे नमूद करताना महापौरांनी अभिजीत कळमकर, संदेश भंडारे, प्रकाश अत्रे, विकास पाटणेकर यांच्या छायाचित्रांचेही मनसोक्त कौतुक केले. ज्यांना प्रत्यक्ष वारीला जाता येत नाही, त्यांच्यासाठी हे प्रदर्शनही एक समृद्ध अनुभव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पंढरीच्या वारीवरील छायाचित्रांचे बोरिवलीत प्रदर्शन
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात ‘रूप पाहता लोचनी’ या पंढरीच्या वारीतील छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
First published on: 08-07-2014 at 06:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandhari wari photographs exhibition in borivali