डोंबिवली येथील नुपूर अविनाश काशिद हिला महाराष्ट्र शासनाची पहिली भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती मिळाली आहे. शासनाने पं. भीमसेन जोशी यांच्या नावे काही सांस्कृतिक उपक्रम सुरू केले असून, त्यात शास्त्रीय संगीतात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस त्यांच्या नावे शिष्यवृत्ती दिली जाते. नुपूरला पुढील दोन वर्षे दर महिना पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. एकूण १२ विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
नूपुर ही पं. मधुकर जोशी यांची शिष्या असून ती गेली १३ वर्षे सातत्याने ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या तिन्ही घराण्यांच्या गायकीची तालीम घेत आहे. नूपुरने मिरज येथील गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद पदवी घेतली असून, एसएनडीटी महाविद्यालयातून एम.ए. केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा