कापसाला राज्य सरकारने शिफारस केलेला ६ हजार रुपये, सोयाबीनला ५ हजार रुपये, धानाला (भात) ३ हजार रुपये प्रतिक्विंटल व उसाला ३ हजार २०० रुपये प्रतिटन भाव मिळावा, तसेच कृषी पंपाची वीजतोडणी थांबवून शेतकऱ्यांना वीजबिल व कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी औरंगाबाद, परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी पानफूल आंदोलन करण्यात आले. आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद-जालना रस्त्यावर कैलास तवार, जयश्रीताई पाटील, अॅड. सा. मा. पंडित, जयाजी सूर्यवंशी, भाऊसाहेब गायके, रमेश शिंदे, विठ्ठल गायके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद-बीड रस्त्यावर विश्वंभर हाके, दगडू वाघमोडे, श्रीकांत हाके, निवृत्ती ढाकणे, तर औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील ढोरकीन गावाजवळ शेख रशीद मौलाना, शिवाजी सोनवणे, मच्छिंद्र गुंड, कांतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
परभणीत ठिकठिकाणी आंदोलन
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्ह्यात सेलू, जिंतूर व परभणी येथे अभिनव आंदोलन केले. प्रवाशांना पानफूल व छापील पत्रक देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली.
येथे उड्डाणपुलावर झालेल्या संघटनेच्या पानफूल आंदोलनात अॅड. अनंत उमरीकर, पुरुषोत्तम लाहोटी, जिल्हाध्यक्ष भगवान िशदे, सुरेश ढगे, मीनाक्षी चोपडे, रंगनाथ चोपडे, रामभाऊ िशदे, अनंत पवार, भास्कर खटींग आदी सहभागी झाले. या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना पानफूल दिले. या वेळी काही प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. सेलू येथे गोिवद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात खंडेराव घुंबरे, रामभाऊ िशदे, संपत कटारे, प्रल्हाद बरसाले, पंडितराव िशदे, मदनमहाराज, एकनाथ पवार, शिवाजी सोळंके, अशोक मुळे आदी सहभागी झाले. जिंतूर येथेही हे आंदोलन करण्यात आले.
शेतीमालाच्या बाजारपेठेवर, तसेच व्यवस्थेवर विविध बंधने व र्निबध सरकार लादत असल्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. यात शेतीमालाच्या बाजार किमती कोसळल्या आहेत. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असल्याची कैफियत संघटनेने मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा