पनवेल शहरातील नागरिकांना रिक्षा चालकांच्या मुजोरपणाला समोरे जावे लागत आहे. शहरातील तीन आसनी रिक्षाचालकांनी मीटरचा वापर न करताच मनमानी भाडे वसूल करण्याचे सुरूच ठेवल्यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालकांचे खटके उडत आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अनास्थेमुळे रिक्षा चालकांची ही मुजोरी सुरूच असून त्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. पनवेल शहरात तीन हजार तीन आसनी रिक्षा आहेत. यापकी काही रिक्षांना ई-मीटर आहेत. मात्र बहुतेकवेळा रिक्षा चालक मीटरप्रमाणे वाहतूक करण्याऐवजी मनमानी भाडेआकारणी करीत असल्याचा अनुभव येथील नागरिकांना रोज येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या मीटर रिक्षाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधीही लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिक व्यक्त करीत आहेत.
ई-मीटरच्या नवीन धोरणाप्रमाणे तीन आसनी रिक्षाचालकांनी भाडय़ाच्या पहिल्या टप्प्यात १९ रुपयांची आकारणी करण्याचा नियम आहे. मात्र हा नियम येथील रिक्षाचालक सर्रासपणे धाब्यावर बसवितात. येथील जनजागृती ग्राहक मंचाने रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून बठकाही घेतल्या. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आणण्यासाठी मंचातर्फे नुकतेच धरणे आंदोलनही करण्यात आले होते. त्याचा परिणाम दोन,तीन दिवस पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरील तीन आसनी रिक्षांची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र उपप्रादेशिक अधिकारी सुट्टीवर गेल्याने ती मोहिम आता पून्हा रखडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा