कोणताही गाजावाजा न करता पनवेल ते दादर (शिवाजी चौक) या मार्गावर धावणारी वातानुकूलित बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) मंगळवारपासून सुरू केली. या बससेवेच्या शुभारंभामुळे या मार्गावर आता वातानुकूलित व साधी अशा दोन सेवा अध्र्या तासांच्या अंतरावर प्रवाशांना  बसथांब्यावर उपलब्ध होणार आहेत.पनवेल-दादर या मार्गावर याआधी १११ क्रमांकाची वातानुकूलित बससेवा सुरू होती. वातानुकूलित बससेवा असल्याने अल्प प्रतिसादामुळे ही बससेवा बंद करावी लागली. त्यावेळी मुंबईची बेस्ट याच मार्गावर धावत होती. या स्पर्धेमुळे या बससेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर हीच बससेवा पनवेल-मंत्रालय करण्याचा प्रयोग एनएमएमटीने करून पाहिला. परंतु तोही दीर्घकाळ चालला नाही. अखेर कोणत्याही शहरात न जाता महामार्गावरून थेट दादर गाठणारी बससेवा सुरू करण्याचा निर्णय एनएमएमटी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी घेतला आहे. या मार्गावर सहा बस वातानुकूलित व इतर सहा बस साध्या असणार आहेत. सुरुवातीला दोन बसमधील अंतर हे अर्धा तास असणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून वेळेचे हे अंतर कमी करण्याचा एनएमएमटीचा विचार आहे. या बससेवेचा क्रमांक १०३ (वातानुकूलित) असून ४२ किलोमीटरच्या अंतिम थांब्यापर्यंतच्या  बससेवेचे तिकीट ११५ रुपये आहे. याच मार्गावर सुरू असणाऱ्या साध्या बससेवेच्या अंतिम थांब्यापर्यंतचे तिकीट ३९ रुपये आहे. शुभारंभाच्या दिवशी या बससेवेला पनवेलकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.    पनवेल स्थानकातून निघालेल्या साध्या बससेवेचा शेवटचा थांबा दादर हिंदमाता आहे. नवीन वातानुकूलित बसचा अंतिम थांबा दादर येथील शिवाजी चौक हा राहणार आहे. पनवेल येथून ही बस रोज सकाळी पावणेसहा वाजता सुटेल. तर दादरहून ही बस सकाळी सव्वासात वाजता सुटेल. तसेच रात्रीच्या सुमारास पनवेल स्थानकातून अखेरची बस साडेआठ वाजता व दादरहून अखेरची बस अकरा वाजता सुटेल. एनएमएमटीच्या वातानुकूलित बससेवेमधून खांदा कॉलनीपर्यंतचे तिकीट ३० रुपये, तर साध्या बसचे तिकीट ९ रुपये आहे. तिपटीहून अधिकचा तिकीट खर्च करून सामान्य प्रवासी महागडा पण सुखकर प्रवास पावसाळा व हिवाळ्यात करतील का, हा प्रश्न काही प्रवाशांना पडला आहे.

प्रवासी भाडे
पनवेल रेल्वेस्थानक ते खांदा कॉलनी साध्या बसचे प्रवासी भाडे ९ रुपये आणि वातानुकूलत बसचे प्रवासी भाडे ३० रुपये.
पनवेल रेल्वे स्थानक ते कळंबोली कॉलनी साध्या बसचे प्रवासी भाडे ११ रुपये आणि वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे ३५ रुपये.
पनवेल रेल्वे स्थानक ते सीबीडी हायवे साध्या बसचे प्रवासी भाडे १८ रुपये आणि वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे ५० रुपये.
पनवेल रेल्वे स्थानक ते वाशी हायवे साध्या बसचे प्रवासी भाडे २३ रुपये आणि वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे ७० रुपये.
टोलमधून सवलत मिळण्याची मागणी
सध्या पनवेल रेल्वे स्थानकातून नवी मुंबई कोपरखैरणे बसडेपो या पल्ल्यावर धावणारी ५० क्रमांकाची बससेवा सुरू आहे. या सर्व बसेसना टोल भरून प्रवास करावा लागतो. त्याचाही भरुदड एनएमएमटीला बसतो. एनएमएमटीने याआधीही टोलमधून एसटी बसप्रमाणे आमच्या बसेसनाही सवलत मिळावी म्हणून मागणी केली आहे. परंतु या मागणीला लोकप्रतिनिधींची साथ न मिळाल्याने अखेपर्यंत ही मागणीच राहिली. ही मागणी पूर्ण झाल्यास रोडपाली ते खारघर रेल्वे स्थानक आणि तळोजा एमआयडीसी ते खारघर रेल्वे स्थानक या बससेवाही निर्विघ्नपणे सुरू होण्यास मदत होईल. पनवेल स्थानकातून मंगळवारी वातानुकूलित बससेवा सुरू झाल्यामुळे पनवेल शहरात जाणारी बससेवा एनएमएमटी प्रशासन गणेशोत्सवात सुरू करणार का, याबाबत प्रवाशांची उत्सुकता वाढली आहे. पनवेल नगर परिषदेने सामान्यांच्या सुखकर प्रवासासाठी एनएमएमटी प्रशासनाला ना हरकत दाखला दिल्याने रेल्वे स्थानक ते शहर अशा तीन विविध मार्गावर सुरू होणारी बससेवा गणेशोत्सवादरम्यान किमान एका मार्गावर सुरू करावी, अशी मागणी सिटीझन युनिटी फोरमने केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader