पनवेलमध्ये बुधवारी दोन तास पडलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील सर्वच सखल मार्गाची अशी अवस्था होती. पनवेल नगर परिषदेने हे मार्ग बांधताना मार्गाची भूसपाटाची समांतररेषा न पाळल्याने हा खोळंबा झाला आहे.  या अभियंत्यांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे बोलले जात आहे. पनवेलमध्ये बडे ठेकेदार राहतात. या  ठेकेदारांना पनवेल पाण्याखाली जात असल्याचे सोयरसुतक दिसत नाही.
पनवेल नगर परिषदेने शहरामध्ये कोटी रुपये खर्च करून नवीन मार्ग बनविलेले आहेत. हे मार्ग काही ठिकाणी सखल, तर काही मार्गाची खड्डय़ांमुळे चाळण झाल्याचे पाहायला मिळते. बुधवारी दोन तास पडलेल्या पावसामुळे शिवाजी चौक ते किंग्ज इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील मार्ग पाण्याखाली गेला. जाखमाता मंदिराशेजारील मार्गावर पाणी साचले होते. पावसाळ्यापूर्वी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांनी स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्याचा दावा बुधवारच्या दोन तासांच्या पावसाने फोल ठरविला आहे.  

Story img Loader