बेघर पारधी समाजाच्या लोकांना निवारा मिळावा, समाजाला न्याय मिळवून द्यावा, या मागण्यांसाठी टाकळगव्हाण (तालुका परभणी) येथील कुटुंबीयांनी महिला, मुला-बाळांसह मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन व उपोषण सुरू केले.
टाकळगव्हाण येथील गायरान जमिनीवरून उठवलेल्या पारधी समाजाला निवाऱ्यास जागा देऊन याप्रकरणी अहवाल सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भटक्या विमुक्त परिवर्तन सेनेने केली. पारधी समाजावर वारंवार अन्याय होत आहे. पोलीस प्रशासनही नाहक त्रास देत आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.
टाकळगव्हाणच्या पारधी समाजातील लोकांना जागा देऊन घरकुल मंजूर करावे, जिल्ह्यातील भटक्या पारधी आदिवासी समाजाने आपले हक्क, तसेच घरकुल, गायरान या प्रश्नांसाठी मंगळवारी परिवर्तन सेनेच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड आंदोलनात कुटुंबासह उपोषण सुरू केले. सखाराम पवार, सरस्वती पवार, मीरा पवार, विमल काळे, मारुती काळे, बाळू काळे, खुशाल पवार, रामा काळे, विजय पवार, उत्तम काळे, मथुराबाई काळे, शीतल काळे, सुवर्णा भोसले आदीचा यात समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा