बार्शी तालुक्यातील वैराग येथे दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वैराग परिसरातील पालकवर्गाला धक्का बसला आहे.
मोहित दशरथ घुंवर (वय १३, रा. पानगाव, ता. बार्शी) या शालेय विद्यार्थ्यांने बार्शी-सोलापूर रस्त्यावर वैरागनजीक पेट्रोल पंपाजवळ एका झाडाला पॅन्टच्या साह्य़ाने गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला. तो सर्जापूर (ता.बार्शी) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमशाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. त्याने आत्महत्या करण्यामागचे निश्चित कारण लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, दत्ता बापू नरोटे (वय १७, रा. तरंगफळ, ता. माळशिरस) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनेही आत्महत्या करून जीवन संपविले. त्याने वैराग येथे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो वैरागच्या महाविद्यालयात शिकत होता.

Story img Loader