स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अभाविप विवेकानंद संस्कार संस्था व राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने रविवारी (दि. २१) परिवार मंगलम् संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनात ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे हे विवेकानंदांचे कुटुंबविषयक विचार, पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेतील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनघा लवळेकर ‘गृहस्थ जीवनातील आव्हाने’ या विषयावर, तर उस्मानाबादचे शेषाद्री डांगे ‘परिवार मंगलम्’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कुटुंबातील अनिष्ट रुढी व शुभ परंपरा, करिअर व कौटुंबिक जबाबदारीतील समन्वय, मुलांचे संगोपन व संस्कार, कुटुंबाचे आर्थिक नियोजन, कौटुंबिक जीवनातील सामाजिक आस्था, सहजीवनाच्या बदललेल्या कल्पना या विषयांवर गटचर्चा करण्यात येणार आहे.
भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगातील आदर्श समजली जात असतानाही तिची आज भारतातच उपेक्षा होत आहे. त्यामुळेच देशभरात सामाजिक समस्यात वाढ होत आहे. कुटुंब व्यवस्थेची कालानुरुप सुसंगत बांधणी करणे यासाठीच या एकदिवसीय परिवार मंगलम् संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनात भाग घेऊ इच्छिणाऱ्या २५ ते ४० वयोगटातील दाम्पत्यांनी प्रफुल्ल कुलकर्णी ९१५८४९३५०२ व कुमुदिनी भार्गव ९४२२०१४२२२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रविवारी परिवार मंगलम् संमेलन
स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अभाविप विवेकानंद संस्कार संस्था व राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने रविवारी (दि. २१) परिवार मंगलम् संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-04-2013 at 03:16 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parivar mangalam sammelan on the occasion of swami vivekananda jayanti