येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात तिस-या मजल्यावरून पडून एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. मारुती दौलू देवकुळे (वय ४५, रा. पिंपळगाव खुर्द) असे या व्यक्तीचे नाव आहे.     
देवकुळे यांना २८ जून रोजी गावामध्ये असताना चेह-याला कुत्र्याने चावा घेतला होता. याकरिता उपचारासाठी ते इस्पितळामध्ये दाखल झाले होते. दूधगंगा इमारतीतील तिस-या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होता. त्यांच्यासोबत पत्नी व सासू याही इस्पितळात थांबल्या होत्या. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान देवकुळे हे पाय मोकळे करतो असे सांगून उपचार कक्षातून बाहेर आले होते. ते इमारतीच्या कट्टय़ावर बसले असताना त्यांचा तोल गेला. तिस-या मजल्यावरून पडल्याने ते जागीच ठार झाले. या प्रकारामुळे इस्पितळातील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पिंपळगावातील पोलीस पाटलांना निरोप देऊन देवकुळे यांचे नातेवाईक व परिचितांना इस्पितळात पाठवून देण्याची सूचना केली. देवकुळे यांचा एक डोळा अधू होता. ते बांधकामावर सेंट्रिंग काम करीत होते. त्यांना पंधरा व सतरा वर्षांची दोन मुले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा