परभणी शहराच्या क्रांतीनगर भागात घटसर्प रोगाचे रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी तातडीने या भागास भेट देऊन तेथील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
क्रांतीनगर भागात घटसर्प रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येताच राज्यमंत्री प्रा. खान यांनी तत्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले. याशिवाय या भागातील लसीकरणाबाबतही सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. क्रांतीनगर भागातील ३९५ घरांचा सव्र्हे केला असता शून्य ते ५ वर्षांखालील २६१ बालके आढळून आली. त्यापकी ९० बालकांना विविध प्रकारची लस देण्यात आली होती. ९५ बालकांचे संपूर्ण लसीकरण झालेले नव्हते तर ९१ बालकांना एकही लस देण्यात आलेली नव्हती. धार्मिक किंवा तत्सम कारणांनी बालकांचे लसीकरण केलेले नसल्याचे लक्षात आल्याने राज्यमंत्री प्रा. खान स्वत या भागात गेल्या. तेथील महिला, नागरिकांना भेटून लसीकरणाबाबतचे त्यांचे गरसमज दूर केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर प्रताप देशमुख, सहायक संचालक डॉ. रोकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जागतिक आरोग्य संघटनेचे लसीकरण तज्ज्ञ डॉ. मुजीब, नगरसेविका रेखा कानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय देशमुख, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक आठवले, रमेश गिरी, डॉ. कल्पना सावंत, डॉ. रवी कुलकर्णी आणि डॉ. एम जावीद अथहर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा