शहरातील घाटी रुग्णालयासह अंबाजोगाई, लातूर आणि नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशी रुग्णांचे मोठे हाल झाले. मुंबईत संपाच्या अनुषंगाने काय चर्चा होते याकडे सर्व डॉक्टरांचे लक्ष लागले होते. काही मागण्या मान्य झाल्याचे वृत्त दुपारनंतर आले.  दिवसभर संप पुकारल्याने घाटी रुग्णालयातील २२० डॉक्टरांनी संपात सहभाग नोंदवला. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले.  वैद्यकीय महाविद्यालयात पोलीस चौकी असावी, विद्या वेतनात वाढ व्हावी, बाँड विषयीचे निर्णय १५ दिवसांत अथवा महिन्याभरात पूर्ण व्हावेत या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये मराठवाडय़ातील ५०० हून अधिक डॉक्टर सहभागी असल्याचा दावा मार्ड या संघटनेने केला. या बंदमुळे घाटी रुग्णालयात रुग्णांचे हाल झाले. मराठवाडय़ासह विदर्भातही मोठय़ा प्रमाणात औरंगाबाद येथील रुग्णालयात रुग्ण दाखल होतात. डॉक्टरांच्या या संपाचा फारसा परिणाम जाणवला नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात होता. मात्र ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे हाल झाले.

Story img Loader