तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी विविध कामांच्या निधीत ३८ लाखांच्या रकमेचा अपहार केला. अपहारातील ५० टक्के रक्कम १५ दिवसांत भरणा करावी. ती न केल्यास सरपंचांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्याचा इशारा जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे यांनी दिला.
िहगोली पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यामार्फत २९ जानेवारीला ८ सरपंचांना गावातील सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, अंगणवाडी, सौरदिवे, शाळा दुरूस्ती आदी कामांसाठी निधी देण्यात आला. या निधीत अपहार केल्याचा आरोप आहे. वसुलपात्र रक्कम भरण्याबाबत बजावलेल्या नोटिशीत अपहारातील ५० टक्के रक्कम १५ दिवसांत भरण्याची मुदत दिली आहे. यात कारवाडीचे सरपंच सय्यद बॉक्सर सय्यद फतरू यांनी ग्रामसेवकासह ६ लाख ९२ हजार ४७६ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. यातील ५० टक्के रक्कम ३ लाख ४६ हजार २३८, मालवाडीचे माजी सरपंच पांडुरंग बुद्रुक यांना ८६ हजार ५००, मालवाडीअंतर्गत चिखलवाडी गट ग्रामपंचायत सरपंच सरस्वती बुद्रुक यांना २ लाख ८८ हजार रुपये, िहगणी येथील सरपंच रेखा घुगे यांना १ लाख ५ हजार ८००, राहुली सरपंच रंजना होंडे यांना १ लाख ५८ हजार ५००, अंधारवाडी सरपंच विश्वनाथ गुठ्ठे यांना ८० हजार रूपये, तर बळसोंड सरपंच ताराबाई शिखरे यांना अपहारातील २० लाख २३ हजार २९६मधून ५० टक्के, म्हणजे १० लाख ११ हजार ६४८ वसूलपात्र रक्कम भरण्याची नोटीस बजावली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा