भारत स्वच्छ अभियानाच्या एकता दौडला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी निशाणाचा झेंडा फडकविल्यानंतर पनवेलची एकता दौड सुरू झाली. नगर परिषदेच्या मैदानात स्वच्छतेचा सामूहिक शपथ ग्रहण करण्याचा कार्यक्रम त्यानंतर नगर परिषद इमारतीसमोरील मार्गावरून एकता दौड आरंभ झाली. दिवाळीच्या विद्यालयांना सुटय़ा असल्याने या दौडमध्ये मुलांनी अल्प प्रमाणात सहभाग नोंदवला होता. स्वच्छतेच्या दौडमध्ये कमी तरुणांचा सहभाग असल्याने किमान कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे पुरुष गटातून दौडमध्ये सामील झाले. आमदार ठाकुरांसह पनवेलकर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी धावले.
पनवेलच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये ३०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. नगर परिषद, सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी दल आणि पनवेलच्या महिला व पुरुषांनी या अभियानामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या सरकारी सोहळ्यात विविध प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशिला घरत यांनी स्वच्छता राखण्याची सामूहिक शपथ दिली.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of panvel run for clean india campaign