गेल्या तीन वर्षांपासून खांदेश्वर रेल्वेस्थानकातून बाहेर आलेल्या प्रवाशांना कामोठे व खांदेश्वर नोडमध्ये जाण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे राहून तीन आसनी रिक्षांची रांगा लावून प्रतीक्षा करावी लागते. या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारी यंत्रणेमुळे प्रवाशांना तीन आसनी रिक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
खांदेश्वरप्रमाणे मानसरोवर रेल्वेस्थानकामधून प्रवास करणाऱ्यांची ही रोजची गैरसोय आहे. घडय़ाळांच्या काटय़ावर चालणारे या प्रवाशांचे जीवनमान या दोन्ही रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यावर कोलमडते. प्रवासी शेकडो आणि रिक्षा बोटावर मोजण्याइतक्या, त्यामुळे असणारी रिक्षांची सोयसुद्धा दुबळी पडली आहे. परिवहन विभागाच्या वतीने अद्याप ही बस सेवा सुरू झालेली नाही.
एकीकडे नवी मुंबई स्मार्टसिटी बनू पाहत आहे. मात्र या नवी मुंबईची ओळख सांगणाऱ्या सिडको वसाहतीमधील प्रवाशांची ही व्यथा आहे. पनवेल नगर परिषदेची परिवहन व्यवस्था सुरू झाल्यावर येथे बस सुरू होईल असे सत्तेमध्ये असणाऱ्या राजकीय पक्षांकडून सांगण्यात येत आहे. ही बस सुरू होण्यासाठी किती काळ लागेल, याचे ठोस उत्तर देण्यास सर्व टाळाटाळ करतात. एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आधारवड यांनी वेळोवेळी या मार्गावर रिक्षा संघटनेची हरकत नसल्यास आणि पोलिसांनी बंदोबस्त पुरविल्यास बस सुरू करण्याचे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आश्वासन दिले आहे. मात्र अद्यापही या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही. आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या आचारसंहितेचे आयते कोलीत वेळ मारून नेणाऱ्यांना मिळणार आहे. लोकहिताच्या शुभारंभासाठी कसली आचारसंहिता पाळताय, अशी टीका प्रवाशांकडून होत आहे.
सिडकोने कामोठे व खांदेश्वर वसाहती वसविल्या आहेत. मात्र सिडकोला प्रवाशांच्या या रोजच्या रांगा दिसत नाहीत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हे सिडकोचा कारभार कशा प्रकारे चालतो हे पाहण्यासाठी अचानक सुट्टीच्या दिवशी वसाहतींना भेटी देतात. तेथील प्रष्टद्धr(२२४)न, समस्या जाणून घेतात. मात्र रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने येथील प्रवाशांच्या रांगा त्यांना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देणारे नवी मुंबई महानगरपलिकेच्या परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिरीष आधारवड यांच्याशी संपर्क साधला असता. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया फोनवर देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटा, त्यानंतर प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. यामागे प्रसारमाध्यमांनी एनएमएमटीची बाजू उलटसुलट मांडल्याने प्रवाशांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे कारण आधारवड यांनी पुढे केले.
प्रवाशांना अजूनही रिक्षांसाठी रांगा लावाण्याचा त्रास
गेल्या तीन वर्षांपासून खांदेश्वर रेल्वेस्थानकातून बाहेर आलेल्या प्रवाशांना कामोठे व खांदेश्वर नोडमध्ये जाण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे राहून तीन आसनी रिक्षांची रांगा लावून प्रतीक्षा करावी लागते. या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारी यंत्रणेमुळे प्रवाशांना तीन आसनी रिक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
First published on: 13-08-2014 at 07:03 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People still stand in queue for auto rickshaw in panvel