विदर्भातील अग्रगण्य नागरी सहकारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या व संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन बँकेला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व नवी मुंबई परिसरात नवीन १३ शाखा सुरू करण्याची परवानगी रिझर्व बँकेने नुकतीच दिली आहे. परवानगी मिळालेल्या शाखांमध्ये बुटीबोरी, वाशिम, कारंजा, शेगाव, खामगाव, चिखली, शिर्डी, अकोला, देगलुर, हिंगणघाट, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, उरण या शहरांचा समावेश आहे.
शरद मैन्द यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या सहकार्याने पुसद अर्बन बँक महाराष्ट्रातील अव्वल नागरी बँक म्हणून यशाकडे वाटचाल करीत आहे. आज बँकेच्या ४९७ कोटी ५० लाखावर ठेवी असून स्वनिधी ३५ कोटी ४७ लाख असून बँकेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सी.आर.ए.आर. १२.०६ टक्के असून नेट एन.पी.ए. १ टक्का, तर निव्वळ नफा ६ कोटी १५ लाख रुपये आहे. बँक दरवर्षी आपल्या सर्व सभासदांना ९ टक्के लाभांश देत असून बँकेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त आहे. नुकतेच बँकेने ए.टी.एम. सुविधा सुरू केलेली आहे. प्रस्तावित शाखा लवकरात लवकर ग्राहकांच्या सेवेत रुजू करण्याचा मानस बँकेचे अध्यक्ष शरद मैन्द यांनी बोलून दाखविला आहे. सध्या बँकेच्या मुख्य कार्यालयासह २५ शाखा कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा