कोल्हापूर जिल्ह्य़ासाठी १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय व १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी दिली.
या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि या वैद्यकीय महाविद्यालयांना पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेली जिल्हा व सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागास संलग्न करण्यात आलेली आहेत. अशा जिल्ह्य़ांच्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाची जिल्हा व सामान्य रुग्णालय निर्माण करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापुरात या रुग्णालयांना मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ासह इतर ९ जिल्ह्य़ांच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच बाळंतपणासंदर्भात सेवा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्य़ासाठी महिला व नवजात शिशू रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे. सध्या या रुग्णालयाकरिता शेंडापार्क, कसबा बावडा अथवा छत्रपती प्रमिलाराजे समोरील न्यायालय कार्यालयाची जागा नियोजित आहे. खर्चाचे नियोजन व पदांची निर्मिती पाच वर्षांत टप्प्याटप्प्यात करावयाची आहे, असे मंडलिक यांनी नमूद केले.
महिला, शिशू रुग्णालयास कोल्हापुरात मंजुरी
कोल्हापूर जिल्ह्य़ासाठी १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय व १०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी दिली. या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि या वैद्यकीय महाविद्यालयांना पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेली जिल्हा व सामान्य रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागास संलग्न करण्यात आलेली आहेत.
First published on: 21-01-2013 at 09:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission to hospital for woman and childrens in kolhapur