कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे. भुदरगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न केले जातील. शिवडाव-सोनवडे घाट रस्त्यासाठी बैठक घेऊन ही मागणी प्राध्यान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी रविवारी केले. भुदरगड तालुका पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन डॉ.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. इमारतीचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करून ते वर्षभरात पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, २ कोटी ३० लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीमधून सामान्यांचे प्रश्न समन्वयाने व तत्परतेने पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोडवावेत. शिक्षण, आरोग्य, सांडपाणी यांसारखे प्रश्न सोडवून ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावा. राज्यस्तरीय संत रोहिदास रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गटविकास अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांचाडॉ. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आमदार के.पी.पाटील, माजी आमदार बजरंग देसाई यांची भाषणे झाली. सभापती वैशाली घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारीअधिकारी पी.बी.पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माणिक पाटील-चुयेकर यांची उपस्थिती होती. या दौऱ्यात डॉ.कदम यांच्या हस्ते गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन नळपाणी योजनांचा शुभारंभ झाला.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न करणार-वनमंत्री
भुदरगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी रविवारी केले.
First published on: 27-05-2013 at 01:45 IST
TOPICSपतंगराव कदम
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personally i will try to solve the problems facing bhudargad taluka patangrao kadam