माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, पुरवठामंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दुपारी बाभळगाव येथे विलासरावांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री विशेष विमानाने सकाळी लातुरात दाखल झाले. विमानतळावरून थेट समाधिस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर बाभळगावच्या घरी जाऊन आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे मार्गस्थ झाले.

Story img Loader