शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील सहायक प्राध्यापक के.व्ही. मारूलकर यांना शिवाजी विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी जाहीर करण्यात आली आहे. ‘इव्होल्यूशन ऑफ कॅपिटल मार्केटस् इन इंडिया’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. भारतीय भांडवल बाजारावर देशभर झालेल्या मोजक्या प्रबंधांमध्ये या प्रबंधाचा समावेश होत आहे. त्यांना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अधिविभागप्रमुख डॉ.एस. एस. महाजन, संचालक डॉ. एच. एम. ठकार व माजी विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.