रोटरॅक्ट क्लब ऑफ औरंगाबाद (पूर्व)तर्फे ‘रीडिस्कव्हर’ या शीर्षकाखाली उद्यापासून (मंगळवार) २५ ऑक्टोबरदरम्यान छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत ऐतिहासिक वारसा, लोक, वास्तुकला, संस्कृती, परंपरा, कला, सण इत्यादी विषयांवर ८ बाय १२ या आकारातील छायाचित्र वैध राहील. स्पर्धेत सहभागासाठी १०० रुपये शुल्क असेल. विजेत्या छायाचित्रकारांना पारितोषिके दिली जाणार असून, त्यांच्या छायाचित्रांचे ‘प्रतिबिंब-छायाचित्रकारांचे’ याद्वारे प्रदर्शन मांडण्यात येईल.  अधिक माहितीसाठी ९८२२६३९२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.   

Story img Loader