अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी येथे धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. मारेकऱ्याचा अजूनही शोध लागला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना तीव्र आहेत. तसेच जादुटोणाविरोधी कायदा प्रभावीपणे जनमाणसात पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, आवश्यक प्रचार साहित्य व प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनात अंनिसचे बीड शाखाध्यक्ष नामदेव चव्हाण, कार्याध्यक्षा प्राचार्या सविता शेटे, विजय घेवारे, करुणा टाकसाळे आदींनी सहभाग नोंदवला.

Story img Loader