रमाई आवास घरकुल योनजेचा ८४ कोटी ४० लाख ११ हजार रुपयांचा परत गेलेला निधी पुन्हा मागवावा, या साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी रिपाइंच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जिल्हय़ातील सर्व नगरपालिकांना सामाजिक न्याय व विशेष साह्य़ विभागाकडून १०९ कोटी ४० लाख ११ हजार रुपये निधी मंजूर केला होता. मात्र, नगरपालिका हद्दीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांकडे स्वतची जागा असतानाही लाभार्थ्यांकडे स्वतची जागा नसल्याची खोटी माहिती सरकारला देऊन प्राप्त निधीपकी ८४ कोटी ४० लाख ११ हजार रुपये निधी सरकारकडे परत पाठविण्यात आला. हा निधी परत मागवावा, खोटी माहिती पुरवणाऱ्या संबंधित अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व नगरपालिका, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. संदीपान हजारे, राजू जोगदंड, शाहू डोळस आदी उपस्थित होते.

Story img Loader