डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जिंतूर तालुक्यातील जांब येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयातर्फे ग्रंथालय संचानालयाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. मुंबईतील शाहीर अमरशेख सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार भाऊसाहेब कांबळे, ग्रंथालय संचालक डॉ. बी. ए. सनान्से, उच्च व तंत्र शिक्षण विभाग उपसचिव श्रीमती तारगे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंदी, माजी आमदार गंगाधर पटने यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. रोख १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Story img Loader