सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २०४१ मध्ये अंदाजे अडीचपट होईल, त्यादृष्टीने नियोजन करावे लागणार आहे, असे मत महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.
महापालिकेने अ‍ॅटो क्लस्टर येथे आयोजित ‘ग्रीन बिल्डिंग’ कार्यक्रमात आयुक्त बोलत होते. या वेळी उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, ईश्वर परमार, हेमंद्र शहा, प्रसाद पवार, विनोद चांदवानी, अरविंद जैन, शहर अभियंता महावीर कांबळे, बांधकाम उपशहर अभियंता वसंत काची, संजय बागलानी, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी क्रेडाईचे संजय देशपांडे, ऑरेंज फाउंडेशनचे संदीप सोनिगरा, ‘एनआरडीसी’ चे भास्कर देओल यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले.
आयुक्त म्हणाले,‘‘िपपरी-चिंचवड हे सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असून भारतात त्याचा तिसरा क्रमांक लागतो. आगामी २०४१ या वर्षांत शहराची लोकसंख्या अंदाजे ४५ लाखाच्या घरात असेल, त्यामुळे यापुढील काळात विकासाची कामे करताना योग्य नियोजन करावे लागणार आहे. नव्या इमारती उभ्या करताना आणखी काळजी घ्यावी व त्या अधिकाधिक पर्यावरणपूरक होतील, याकडे लक्ष द्यावे लागेल. केवळ पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था करणे म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ नाही. काही व्यावसायिक सवलती मिळवण्यासाठी असे प्रकल्प राबवतात व नंतर दुर्लक्ष करतात, तसे होता कामा नये. आपण अडीचपट वाढत असताना नियोजन नाही. भविष्याचा विचार करता नियोजन करावे लागणार आहे,’’असे आयुक्तांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा