टिटवाळा गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारातच मोठाले खड्डे पडून त्यात सांडपाणी तुंबत असल्याने भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पडलेले हे खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर काढला जात आहे.
या भागातील नगरसेवक बांधकामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनाही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. या भागात पाण्याची एक जलवाहिनी जमिनीखाली फुटली आहे. तिचाही शोध कर्मचाऱ्यांना लागत नसल्याने दररोज गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांना खड्डे आणि त्यामधील चिखल तुडवत मंदिरात यावे लागते. स्थानिक नगरसेवक हे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Story img Loader