कृषी खात्यातील रोपमळा मदतनीस पदासाठीची परीक्षा येत्या २ डिसेंबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल, सिव्हिल लाईन्स येथे २ डिसेंबरला दुपारी १ ते ३ या वेळेत होणार आहे. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र त्यांच्या पत्त्यावर टपालाने पाठवण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाले नसेल, त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.गजाननडाटाप्रो.कॉम या संकेतस्थळावर रोपमळा मदतनीस आय कार्ड या लिंकवर क्लिक करून आपल्या प्रवेशपत्राचे प्रिंट काढावे. तसेच १ डिसेंबपर्यंत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात आवेदन पत्राची छायांकित प्रत व कागदपत्रे सादर करून प्रवेशपत्र मिळवावे.
रोपमळा मदतनीस पदाची २ डिसेंबरला परीक्षा
कृषी खात्यातील रोपमळा मदतनीस पदासाठीची परीक्षा येत्या २ डिसेंबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल, सिव्हिल लाईन्स येथे २ डिसेंबरला दुपारी १ ते ३ या वेळेत होणार आहे. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र त्यांच्या पत्त्यावर टपालाने पाठवण्यात आले आहे.
First published on: 22-11-2012 at 03:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plantation helper post exan on 2nd december