गोंदियात वसंतोत्सव संमेलनात फुलला कवितांचा वसंत  
‘गजल, गुलजार कर रही सांसो को आज फीर,
बस एक कदम ही काफी है, बरपाने हर्श को..
उठ रही मलाला रुखसाना आज फिर’
ज्येष्ठ कवयित्री डॉ. अंजूम खान यांच्या या स्वरबहार रचनेने मोहित झालेले सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन गेले. औचित्य होते बहुभाषिक साहित्य मंडळाच्या वसंतोत्सव कवी संमेलनाचे. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या आमंत्रित प्रसिद्ध कवींची शब्दसुमने झळकू लागली अन् कवी संमेलनाचा वसंताचा बहार फुलला. ‘एक से बढकर एक’ कविता समाजाची विदारकता सांगून गेली.
‘‘आओ भ्रष्टाचार की पूजा कर ले हम ईमान से,
नाम उठेगा, नाम जगेगा, पुरे िहदुस्थान से..
किसकी नियत साफ है, सब कोई तनकर बठे है,
एक घोटाला तुम भी खरिदो, मेरे िहदुस्थान से?’
िछदवाडाचे हास्य कवी व गीतकार रत्नाकर रतन यांनी आजच्या भ्रष्टाचारवादी समाज रचनेवर प्रहार केला. देशाची विदारक स्थिती रचनेतून मांडून रसिकांची दाद मिळवली. छत्तसीगडचे गीतकार गोपाल वर्मा व युवा व्यंग्यकार तरुण जैन यांनीही दमदार कल्पना सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
‘अपने फिगर का सत्यानाश कर रहा हूँ
मं आदमी होने का प्रयास कर रहा हूँ..’
आलोक शर्मा यांनी या कवितेतून हास्याचे फवारे उडवत संपूर्ण सभागृहाला खिळवून ठेवले. ‘मेरे देश को माओवादियों से ज्यादा खाओवादियों से खतरा है’ या रचनेतून आजच्या राजकीय व्यवस्थेची सत्य परिस्थिती मांडली. वर्मा यांनी ‘बस अंत हो गया, मेरा बसंत खो गया’ या ओळीतून कविसंमेलनाला अत्यंत गंभीर वातावरणात नेऊन सोडले. जबलपूरचे जनाब भीमसेन शहीद यांनी कविसंमेलनाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या ‘गंगा की शीतल लहरों को मंदिर तक आते देखा..’ या ओळी श्रोत्यांच्या मनात कायमचे घर करून गेल्या. गीतकार दयाशंकर मौन यांच्या ‘प्रेम विरहाच्या’ शृंगार कवितेने कविसंमेलनाला नवा साज चढवला. संचालन करणारे प्रसिद्ध व्यंग्यकार राजेंद्र राही यांनी प्रसार माध्यमांनाच धारेवर धरले. तीन तास चाललेल्या या संमेलनाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. संमेलनाला रणजित जसानी, संस्थाध्यक्ष सुनील धोटे, ठाणेदार सुनील बोंडे, एमआयडीसी अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल, डॉ. चौरसिया, युवा उद्योगपती घनश्याम गुप्ता, संतोष पुरोहित, संयोजक माणिक गेडाम, शशी तिवारी, उपाध्यक्ष राम कुंदानी, सचिव मनोज जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनासाठी सहसचिव जितेंद्र तिवारी, निखिलेश सिंह यादव, प्रचार प्रमुख सलीम अख्तर, अनिल भोजवानी, छगन पंचे, महेश उरकुडे, प्रा. श्रद्धान्विता तिवारी, सोनाली उमरे आदींनी सहकार्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा