महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिगामी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारणाऱ्या कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (दि. १२) होणाऱ्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. यशवंत मनोहर असतील. उद्घाटन माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते होणार आहे.
कविसंमेलनात ज्येष्ठ शायर बशर नवाज, विजयकुमार गवई, खान शमीम खान, प्रकाश घोडके, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. आदिनाथ इंगोले, युसुफ खान, डॉ. प्रतिभा अहिरे, देवानंद पवार सहभागी होणार आहेत. कविसंमलेनाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे करणार आहेत. या प्रसंगी समता परिषदेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष जयराम साळुंके, भाऊसाहेब थोरात, मसापचे कार्यवाह कुंडलिक अतकरे, डॉ. अशोक शेरकर उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात होणाऱ्या या कविसंमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल ताठे, रमेश गायकवाड, डॉ. भाऊसाहेब झिरपे, राजानंद सुरडकर, मैत्रेय सांस्कृतिक मंचातर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader