कविता आयुष्यात आली आणि जीवनाला वेगळे धुमारे फुटले. कवितेने जसा आत्मविश्वास मिळाला, तसा आनंदही दिला. एकूणच कविता जगण्यासाठी प्रेरक ठरली, असे मनोगत युवा कवयित्री प्रियंका डहाळे यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना कवयित्री डहाळे यांनी कविता वाचन आणि त्या अनुषंगाने आपले अनुभव कथन केले. वाचनालयाचे सचिव हेमंत पोतदार यांनी त्यांचे स्वागत केले. डहाळे यांची मुलाखत वाचनालयाच्या ग्रंथ सचिव मधुरा फाटक यांनी घेतली.
 कार्यक्रमास कवयित्री निशिगंधा घाणेकर, अलका कुलकर्णी, जयश्री वाघ, अनिता खर्डे, अनिल वाघ, शिरीष भालेराव, अल्लाउद्दीन मुलाणे, अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.
विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा