घोडबंदर रोडवरील डोंगरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या भरून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली. सुरेश बिष्णोई, सुभाष बिष्णोई, श्यामलाल बिष्णोई आणि श्रवण बिष्णोई या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ७२ सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 कासारवडवली येथील पुराणिक इस्टेटच्या मागील जंगलात एल.पी.च्या घरगुती सिलेंडरमधून एका नळीच्या साहाय्याने व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता. शिवाय बेकायदेशीररीत्या भरलेला हा सिलेंडर जास्तीच्या किमतीमध्ये विकला जात असल्याची माहिती  पोलिसांनी मिळाली होती.
बुधवारी पोलिसांनी छापा टाकून सुरेश बोष्णोई यास रंगेहात अटक केले.  इतर पसार झालेल्या साथीदारांना पोलिसांनी गुरुवारी मुंबईतून अटक केली. ही टोळी तीन ते चार महिन्यांपासून हा काळाबाजार करीत होते. अधिक  पोलीस तपास करीत असल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Story img Loader