भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक अशोक तुकाराम देवतळे, विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश औदुंबर दुद्दलवार, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र प्रल्हाद सराफ, हवालदार नामदेव इंगोले, हवालदार जगमोहन तिवारी यांना मुंबईत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींचे पोलीस पदक राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.   
महाराष्ट्र पोलीस दलातील ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्यावर्षी गणतंत्र दिनी राष्ट्रपतींनी पदके जाहीर केली होती. ती त्यांना राजभवनात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.  महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच नागपूरचे माजी पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, विद्यमान पोलीस आयुक्त कौशल पाठक यांच्यात त्यात समावेश होता.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्यासह इतर पोलीस आणि शासकीय अधिकारी, पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित  होते.   

Story img Loader