घरगुती कलहाने नराश्य आलेल्या अमोल दिनकर कांबळे (वय ३०) या तरुण पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
अनुकंपा तत्त्वावर २००६ मध्ये नांदेड पोलीस सेवेत कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेला अमोल कांबळे हा सिडको पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता. पोलीस ठाण्यातल्या गस्ती पथकावर कार्यरत असलेला अमोल कांबळे शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर ११ वाजता तो घरी गेला. स्वत:च्या सहा वर्षांच्या मुलाला बाहेर जाण्यास सांगून त्याने गळफास घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सिडको पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचा दावा अमोल कांबळे यांच्या पत्नीने केला असला तरी त्याच्या आईने मात्र कौटुंबिक वाद असल्याचे मान्य केले. गेल्या काही दिवसांपासून तो निराश होता. त्याला दारूचे व्यसनही लागले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा