विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक संभाजी कोंडिबा सरोदे याला तीन दिवस, दि. ३१पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने आज दिला. श्रीगोंदे तालुक्यातील देऊळगावमध्ये ही घटना घडली.
विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार शाळेच्या मुख्याध्यापिकेने पोलिसांकडे फिर्याद दिली. राजकीय दबावातून २२ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केली. सरोदे याच्या विरोधात भादंवि कलम ३५४ व लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोदे याला आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी सरोदेला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सरोदेचे कृत्य शिक्षकी पेशाला न शोभणारे आहे. त्याच्याविषयी विद्यार्थिनींच्या अनेक तक्रारी आहेत. तो साक्षीदार विद्यार्थिनींना दमदाटी करू शकतो, असा युक्तिवाद सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील रमेश जगताप यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा