सहकारमहर्षी किसनराव वराळ पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबुशा वरखडे यांना संस्थेतील आठ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. त्यांना नगर येथील न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता त्यांना दि. १३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. संस्थेच्या विद्यमान संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी नगरच्या न्यायालयात केलेल्या अर्जावर सोमवारी होणार असून, या सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वरखडे यांच्या अटकेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संस्थेचे माजी संचालकही हादरले आहेत. पोलिसांनी माजी पदाधिकारी व संचालक, व्यवस्थापकांची यादी, लेखापरीक्षणाचे अहवाल ताब्यात घेतले असून, त्यानुसारच वरखडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर संस्थेच्या विद्यमान संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेले असताना त्यावरील सुनावणीपूर्वीच पारनेर पोलिसांनी लेखापरीक्षणाच्या अहवालाच्या आधारे वरखडे यांच्यावर कारवाई केली आहे. यांना नगरच्या न्यायालयापुढे उभे करण्यात आले. पोलिसांच्या वतीने विविध लेखापरीक्षण अहवाल न्यायालयापुढे मांडण्यात आले. सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने वरखडे यांना दि. १३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली.
या संस्थेची स्थापना १९९७ साली झाली. पोलिसांच्या हातात विद्यमान पदाधिकारी तसेच संचालकांसह माजी पदाधिकारी व संचालकांची असे ३५, दोघे व्यवस्थापक अशी ३७ जणांची यादी आहे. वरखडे यांच्या कार्यकाळात रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांना धाब्यावर बसून बेकादेशीर खरेदी तसेच बांधकाम केल्याचा ठपका लेखापरीक्षणाच्या अहवालात वरखडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. वरखडे यांच्यावर सुमारे वीस लाख रुपयांची जबाबदारी त्या वेळी लेखापरीक्षकांनी ठेवली होती.

Story img Loader