सहा महिलांनी बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे नोंदविलेल्या माजी आमदार लक्ष्मण माने यांना सातारा न्यायालयाने आज तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
 गुन्ह्य़ांची नोंद झाल्यानंतर मागील १५ दिवसांपासून गायब असलेले माने काल पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान रात्री अकराच्या दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता दवाखान्यातून माने यांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान लैंगीक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेल्या माने यांची पद्मश्री काढून घेण्याची मागणी भाजपने आज केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to laxman mane