पोलीस नाईकने विनयभंग व बलात्कार केल्याची फिर्याद वाई पोलिसात दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गणेश नामदेव घोटकर यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर वेळोवेळी बोलून धमकी देऊन, तुझ्याशी मैत्री करायची आहे, असे सांगून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुलतानपूर टेकडीजवळ मोकळ्या जागेत तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केल्याची व २ जून रोजी एका रुग्णालयाच्या जवळ हात पकडून विनयभंग केल्याची फिर्याद वाई पोलिसांत दाखल झाली असून पोलीस नाईक घोटकर याना दोन दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to police