पाटण तालुक्यातील कोंजवडे येथे शालेय पोषण आहारातील धान्य चोरण्याचा प्रयत्न करणा-या उत्तम नारायण जाधव (रा. तारळे, ता. पाटण) या मुख्याध्यापकास ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. शिक्षणविस्तार अधिका-यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिसात संबंधित मुख्याध्यापकावर चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी उत्तम जाधव यांना अटक केली असून, पाटण येथील न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उत्तम जाधव याच्याकडून जप्त करण्यात आलेला तांदूळ, तूरडाळ, मसूरडाळ हे धान्य दहा हजार रुपये किमतीचे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अरुण देवकर करत आहेत. जाधव हे कोंडवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असून, शाळेस प्रत्येक महिन्याला पोषण आहाराचे धान्य प्राप्त होत होते. हे धान्य महिन्याच्या कालावधीत संपत नव्हते. मात्र, मुख्याध्यापक जाधव संबंधित धान्य संपल्याचे कागदोपत्री वरिष्ठांना दाखवत असे. प्रत्यक्षात शिल्लक धान्य ते शाळेतच एका ठिकाणी साठवून ठेवत. अनेक महिने हा प्रकार सुरू होता. सध्या शाळेला उन्हाळी सुटी असताना रात्री दहाच्या सुमारास एक टेम्पो (एमएच ११ एजी ४८८५) शाळेच्या आवारात उभा असल्याचे व त्यात पोती भरली जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी तेथे जाऊन पाहिले असता मुख्याध्यापक जाधव शाळेतून धान्याची पोती टेम्पोमध्ये भरत होते. ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामस्थांनी तारळे विभागाचे शिक्षण विस्तार अधिकरी विश्वनाथ चव्हाण यांना ही माहिती दिली. त्यांनी खातरजमा करून उंब्रज पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीवरून जाधव यांच्यावर चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2013 रोजी प्रकाशित
शालेय पोषण आहार पळविणा-या मुख्याध्यापकास पोलीस कोठडी
पाटण तालुक्यातील कोंजवडे येथे शालेय पोषण आहारातील धान्य चोरण्याचा प्रयत्न करणा-या उत्तम नारायण जाधव (रा. तारळे, ता. पाटण) या मुख्याध्यापकास ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-05-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to principal for stolen grains of shaley poshan aahar