कुख्यात गुंड भरत त्यागी खून प्रकरणी मुख्य सूत्रधार, काँग्रेसचा नगरसेवक संजय शंकराव तेलनाडे आणि त्याचा भाऊ सुनील तेलनाडे या दोघांना शुक्रवारी जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता १७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर, विठ्ठल सुतार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, न्यायालय परिसरात गोंधळ करणाऱ्या चौघांना पोलिसांनी समज देऊन त्यांची सुटका केली.
११ ऑगस्ट रोजी जयसिंगपूर येथे सराईत गुंड भरत त्यागी याचा खून झाला होता. या खूनप्रकरणाचा तपास कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभाग करत असून याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संजय तेलनाडे, विठ्ठल सुतार या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आणि गुरूवारी अटक केलेला सुनील शंकरराव तेलनाडे या तिघांना शुक्रवारी जयसिंगूपर न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांपकी तेलनाडे बंधूंना १७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी तर विठ्ठल सुतार याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तेलनाडे बंधूंना न्यायालयात हजर करण्याच्या पाश्र्वभूमीवर न्यायालय परिसरात राज्य राखीव दलाच्या पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. या वेळी गोंधळ करणाऱ्या चौघा जणांना जयसिंगूपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना समज देऊन सोडल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जयसिंह रिसवडकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा