एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे सुरू असूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल या पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव लटपटे यांना निलंबित करण्याचे आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बजावले.
जिल्हय़ात अवैध धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याच्या तक्रारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे अनेकांनी केल्या. पोलीस कारवाई करीत नसतील, तर अन्य जिल्हय़ांतील पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे सूतोवाच मंत्र्यांनी केले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ईडनगार्डन येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून सोलापूर पोलिसांनी छापा टाकून संबंधितांवर गुन्हा नोंदवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक लटपटे यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले.

Story img Loader