लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशभरात मतदानासाठी पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम सुरू केली आहे, त्याची अंमलबजावणी उरण परिसरातही सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार उरण शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी केली जात आहे.
उरण-पनवेल तसेच नवी मुंबई परिसरातून येणाऱ्या वाहनांची तपासणी गव्हाण फाटा येथे पोलिसांच्या सहकार्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जात आहे. उरण परिसरातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आदी ठिकाणीही अशा प्रकारची तपासणी केली जात आहे.

Story img Loader