शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली तालुक्यात आज केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शोध मोहीम राबवित असतांना त्यांची दोनदा नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात कुणीही जखमी झाले नाही. हे जवान आज सकाळी जाराबंडीवरून हालेवाराच्या जंगलात जात असतांना दुपारी बाराच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर मोहीम राबवून हे जवान परततांना पुन्हा नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. दोन्ही वेळेस सुमारे पंधरा मिनिटे गोळीबार चालला. नक्षलवादी पळून गेल्यानंतर जवानांनी घटनास्थळाची पाहणी करून काही साहित्य जप्त केले आहे.

Story img Loader