पोलिसांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांची निवास-भोजनाची व्यवस्था आमदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेने केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने १३ मे पासून शहरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस भरतीसाठी बाहेरगावाहून मोठय़ा प्रमाणात आलेल्या उमेदवारांपुढे निवास-भोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण ही गैरसोय होऊ नये, पाण्यासह निवास-भोजनाची व्यवस्था व्हावी या दृष्टीने आमदार जाधव यांनी पुढाकार घेत यांनी सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले. १६, १७, १९ व २० मे या ४ दिवसांत उमेदवारांची शारीरिक चाचणी पोलीस प्रशासन घेणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ मैदानावर चाचणीचे आयोजन केले आहे. विद्यापीठ शहरापासून दूर असल्याने तेथे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून आमदार जाधव यांनी पुढाकार घेतला. भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांची भोजन, निवास व पाण्याची व्यवस्था त्यांनी भरती स्थळापासून जवळच केली. आमदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, उपशहरप्रमुख सचिन पाटील, देवेंद्र देशमुख, शाखाप्रमुख राजेश महामुनी, विष्णू मोहिते, प्रभाकर दशरथे, अक्षय वाघमारे, राजेश कदम, संदीप सौंदडकर, अर्जुन डिघोळे, नितीन अवचार आदींनी हे प्रयत्न केले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा