भोसरीच्या सद्गुरूनगर येथील जुगाराच्या अड्डय़ावर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा टाकून बीएमडब्ल्यू या आलिशान मोटारीसह सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत जुगार अड्डय़ाच्या चालकासह १३ जणांना अटक करण्यात आली
आहे.
सद्गुरूनगर भागात जुगाराचा अड्डा असून, त्या ठिकाणी लाखोंचा जुगार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, पोलीस निरीक्षक बी. मुदीराज, उपनिरीक्षक शैलेजा सावंत यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांसह रात्री या जुगाराच्या अड्डय़ावर छापा घातला. त्या ठिकाणी १३ जणांना पकडण्यात आले. बीएमडब्ल्यू मोटारीसह आठ वाहने, विदेशी मद्य, रोख रक्कम आदी सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जुगाराच्या अड्डय़ावरून जप्त करण्यात आला.    

Story img Loader