प्रकल्पग्रस्तांनी भूमाफियांना हाताशी धरून बांधलेल्या चाळी, इमारतींमध्ये स्वस्त किमतीत मिळणारी घरे घेऊन व्यापार व्हिसावर नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात नायजेरियन नागरिक आले असून ते याच ठिकाणी राहत असल्याचे आढळून आले आहे.
जुहूगाव, घणसोली आणि बोनकोडे ही ठिकाणे या नायजेरियन नागरिकांचे अड्डे झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जुहूगावात काल धिंगाणा घालणाऱ्या सहा नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी अटक केली. नवी मुंबई पोलिसांची हे नायजेरियन नागरिक एक डोकेदुखी झाली असून त्यांचे व्हिसा तपासण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले. नायजेरियामधील हजारो नागरिक भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने येतात. नवी मुंबईत ही संख्या अलीकडे वाढल्याचे दिसून येते. कपडे विक्रीसाठी येणारे हे नायजेरियन भारतात मुक्काम ठोकून राहू लागले आहे.
नवी मुंबईतील ग्रामीण भागात गरजेपोटीच्या नावाखाली काही भूमाफियांना बांधलेल्या चाळी व इमारतींतील घरे या नायजेरियन नागरिकांनी विकत अथवा भाडय़ाने घेतलेली आहेत. कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता केवळ रोख रक्कम दिल्यानंतर येथील घरे विकण्यात आलेली आहेत. त्यामुळे ती या नायजेरियन नागरिकांनी एकत्र येऊन विकत घेतलेली आहेत. त्यांचा धिंगाणा या घरात सुरू असल्याची तक्रार आता अनेक रहिवासी करू लागले आहेत. शरीरयष्टी मजबूत असणाऱ्या नायजेरियन नागरिकांनी फसवणुकीचे धंदे सुरू केले आहेत. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करताना कचरत असल्याचे दिसून येते. घणसोली, जुहूगाव, बोनकोडे, कोपरी या अनधिकृत घरांच्या माहेरात या नायजेरियन नागरिकांचा भरणा मोठय़ा प्रमाणात आहे. जुहूगावामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या सहा नायजेरियन नागरिकांना वाशी पोलिसांनी सोमवारी बेडय़ा ठोकल्या. त्यांना अटक केल्यानंतर कोणतीही पश्चात्तापाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. या भांडणाच्या वेळी ही संख्या ३० ते ३५ होती असे दिसून आले आहे. एका ठिकाणी एकत्र येऊन दारू आणि इतर नशा करण्याचे त्यांचे उद्योग असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर या सर्व संशयित नायजेरियन नागरिकांच्या व्हिसा पासपोर्टची तपासणी केली जाणार असल्याचे उपायुक्त पाठक यांनी स्पष्ट केले. नायजेरियन नागरिकांना व्हिसा देताना त्यात काटेकोरपणा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader