शेतीमालास रास्तभाव मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथून निघालेली शेतकरी ‘पायी िदडी’ सोमवारी औरंगाबाद येथे पोहचणार आहे. प्रामुख्याने बीड लोकसभा मतदारसंघाची राजकीय मशागत करत औरंगाबाद येथे सोमवारी िदडी समारोपाच्या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह व खासदार गोपीनाथ मुंडे सहभागी होणार आहेत. शहरातील क्रांतीचौक ते आयुक्त कार्यालयापर्यंत िदडीत नेते सहभागी होणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची तयारीसाठी लगभग सुरू होती. कापूस व सोयाबीन या दोन प्रमुख पिकांच्या दरात सतत चढ-उतार होतात. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना सहन होणारा नाही. त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी ही िदडी असल्याचे िदडीचे प्रमुख पाशा पटेल यांनी सांगितले.
१९ दिवसांच्या या िदडीत भारतीय जनता पक्षातील प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली. िदडीचे १० मुक्काम बीड जिल्ह्यात होते. दोन लातूर जिल्ह्यात, एक जालना तर औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी िदडीचा मुक्काम होता. चालत सहभागी झालेल्या नेत्यांनी कापूस व सोयाबीनसाठी रास्तभाव मिळावा, हा मुद्दा प्रामुख्याने मांडला. शेती प्रश्नांची मांडणी सोप्या भाषेत करत असल्याने या िदडीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा माजी आमदार पाशा पटेल यांनी केला. मात्र, िदडीचा एकूण प्रवास पाहता बीड लोकसभा मतदारसंघात अधिक काळ गेल्याचे दिसून आले. ही राजकीय मशागत होती का, असे रविवारी खासदार गोपीनाथ मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपने यापूर्वी बऱ्याचदा आंदोलने केली आहेत. लोकसभा निवडणुकीला अजून तसा वेळ आहे. पण निमित्ताने राजकीय तण निघाले तर काय हरकत आहे?
लोकसभा निवडणुकीपूर्वी निघालेल्या या िदडीच्या निमित्ताने शेती मालास रास्तभाव देण्याचा मुद्दा उचलण्यात आला आहे. गुजरातमधील काही नेते मंडळी, राष्ट्रीय संघटन बांधणारे काही नेते या िदडीत सहभागी झाले होते. त्यामुळे ही िदडी राजकीय मशागतीचा भाग मानली जाते. या दिंडीत अग्रेसर असणाऱ्या माजी आमदार पाशा पटेल यांचे या निमित्ताने राजकीय पुनर्वसन होईल, ही चर्चाही भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी मुंडे-गडकरी वादात पाशा पटेल यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2013 रोजी प्रकाशित
कापूस, सोयाबीन दिंडीतून भाजपची राजकीय मशागत
शेतीमालास रास्तभाव मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथून निघालेली शेतकरी ‘पायी िदडी’ सोमवारी औरंगाबाद येथे पोहचणार आहे. प्रामुख्याने बीड लोकसभा मतदारसंघाची राजकीय मशागत करत औरंगाबाद येथे सोमवारी िदडी समारोपाच्या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह व खासदार गोपीनाथ मुंडे सहभागी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-10-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political culture of bjp in cotton soya bean dindi