कल्याण पश्चिमेतील झुंझारराव मार्केट परिसरात एक फुटलेल्या जलवाहिनीला मलवाहिनी येऊन मिळाल्याने या परिसराला गेल्या आठवडाभरापासून मलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने पाणी पिणे अशक्य झाले आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
झुंझारराव मार्केटजवळील साई मंदिराजवळ ही जलवाहिनी फुटली आहे. तेथून गेलेल्या मलवाहिनीचे मल जलवाहिनीतून वाहत असल्याने हे मलमिश्रित पाणी परिसरात घराघरात पोहचत आहे. याविषयी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात तक्रारी करूनही तुमची समस्या दोन दिवसात सोडवली जाईल, अशी उत्तरे गेल्या सात दिवसापासून नागरिकांना देण्यात येत आहेत. या भागात हॉटेल्स, व्यापारी बाजारपेठा आहेत. पालिकेचा पाणीपुरवठा शहराच्या १४ लाख लोकसंख्येच्या जिवाशी खेळत असल्याने करदात्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Story img Loader