देशालाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाला हादरवून सोडणाऱ्या भोपाळ वायू दुर्घटनेला मंगळवार २ डिसेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. तीन दशकांचा काळ लोटला तरी विषारी वायूमुळे दहा हजारांहून अधिक बळी घेणाऱ्या आणि इतर हजारोंना आयुष्यभराचा त्रास मागे ठेवणाऱ्या या दुर्घटनेचे व्रण कायम आहेत, मात्र दुर्दैवाने त्यापासून बोध घेतला नाही हेच उल्हासनगरमधील घटनेने दाखवून दिले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या राज्यातील सर्वात दाटीवाटीच्या नागरी परिसरात वाहनांची गर्दी असो, की कारखान्यांचा धूर वा रस्त्यावरील धूळ वायू प्रदूषण शिगेला पोहोचले आहे. रोज थोडा थोडा विषारी वायू लोकांच्या शरीरात नाका-तोंडावाटे जात आहे. आलिशान वातानुकूलित गाडय़ांमधून फिरणाऱ्या नेत्या-प्रशासकीय अधिकाऱ्यांना याचे कसलेही सोयरसुतक नाही.. मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणाच्या आढाव्यात हेच भीषण वास्तव अधोरेखित झाले.. ३० वर्षांपूर्वी स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागेल अशी कल्पना कुणी केली नव्हती. आज ती परिस्थिती आली.. आता स्वच्छ हवेबाबत हेच होण्याची भीती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा