विलेपार्ले कोकणस्थ ब्राह्मण कट्टा आणि विलेपार्ले सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २६ मार्च रोजी प्रदूषणमुक्त होळीपूजन कार्यक्रम होणार आहे. विलेपार्ले पूर्व येथील हनुमान रस्त्यावरील जनता सहकारी बँकेसमोरील डॉ. हेडगेवार मैदान येथे हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे. विविध सोसायटय़ांमधून नागरिकांनी आपल्याकडील एक दिवसाचा ओला व कोरडा कचरा देऊन या मोठय़ा कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचे वाटप पर्यावर दिनी, म्हणजे ५ जून रोजी केले जाणार आहे. या उपक्रमाला मुंबई महापालिकेचे सहकार्य मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रसाद पेंडसे- ९८३३९१५९६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
विलेपार्लेमध्ये प्रदूषणमुक्त होळीचे आयोजन
विलेपार्ले कोकणस्थ ब्राह्मण कट्टा आणि विलेपार्ले सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २६ मार्च रोजी प्रदूषणमुक्त होळीपूजन कार्यक्रम होणार आहे. विलेपार्ले पूर्व येथील हनुमान रस्त्यावरील जनता सहकारी बँकेसमोरील डॉ. हेडगेवार मैदान येथे हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे.
First published on: 24-03-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polution free holi organized in vile parle