राज्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी िहगोली, पुणे व लातूर येथे तीन तंत्रनिकेतने सुरू होत असून, लातूरच्या तंत्रनिकेतनसाठी आपण प्रयत्न केल्याचे खासदार जयवंत आवळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
राज्यात १२ शासकीय तंत्रनिकेतने आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी तीन स्वतंत्र तंत्रनिकेतने सुरू करण्याचे अल्पसंख्याक व वस्त्रोद्योग खात्याचे मंत्री नसीम खान यांनी ठरवले होते. िहगोली व पुणे ही दोन ठिकाणे निश्चित झाली होती. आपण स्वत: व आमदार अमित देशमुख यांनी लातूरसाठी आग्रह धरून स्वतंत्र तंत्रनिकेतन मंजूर करून घेतले. येत्या सप्टेंबरमध्ये हे तंत्रनिकेतन सुरू होईल. मेकॅनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रिकल या तीन शाखांमध्ये प्रत्येकी ६० जागा आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध जैन धर्मातील विद्यार्थ्यांसाठी या तंत्रनिकेतनला प्रवेश मिळणार असल्याचे खासदार आवळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा